ठाणे वाहतूक पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; १६० शाळांमध्ये वाहतूक नियम, सायबर सुरक्षा व अंमली पदार्थांविरोधात मार्गदर्शन

ठाणे वाहतूक पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; १६० शाळांमध्ये वाहतूक नियम, सायबर सुरक्षा व अंमली पदार्थांविरोधात मार्गदर्शन…

विधानसभा आणि लोकसभेला मतदान केलं; ठाणे शहरातील माजी नगरसेवकाचेच नाव मतदार यादीतून वगळलं

विधानसभा आणि लोकसभेला मतदान केलं; ठाणे शहरातील माजी नगरसेवकाचेच नाव मतदार यादीतून वगळलं

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – मतदार याद्यांमधील घोळाचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. कुठे दुबार, तिबार मतदारांची नोंदणी झालेली आहे, तर कुठे मतदारांचा पत्ताच बदलला आहे. काही ठिकाणी मतदारांचे नाव दुसऱ्याच विधानसभा मतदारसंघात आहेत, तर कुठे तालुकाच बदललला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांच्या, भावी उमेदवारांच्या नावातही अशीच गडबड झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता, ठाणे शहरातील माजी नगरसेवकाचेच नाव मतदार यादीतून वगळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे, भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये, गतवर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण येथील प्रभागातून, मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला होता हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, अनावधानाने सुधीर भगत यांचं नाव वगळण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाने मान्य केलं आहे. दरम्यान, मतदार यादीतील या घोळामुळे मुंब्रा भागातील नगरसेवकांना प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुधीर रामचंद्र भगत यांचं नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत समाविष्ट होते. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी मतदान केलेले होते. त्यानंतर, कोणत्याही प्रकारची निवडणूक नसल्याने त्यांनी मतदार यादी तपासली नाही. तथापि आगामी कालावधीत होऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५ च्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२५ मध्ये वादी यांनी त्यांच्या मतदारयादीतील नावाबाबत ऑनलाईन तपासणी /पडताळणी केली असता त्यांचे नाव मतदारयादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, भगत यांनी मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात चौकशी केली असता सदरचे नाव माहे मार्च २०२५ मध्ये वगळणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, नाव वगळणीबाबत विलंबाने अपील अर्ज दाखल करुन त्यांनी अपील ग्राह्य धरण्याबाबत विनंती केली. दरम्यान, सुधीर भगत हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी कुटुंबीयांसह ७०-७५ वर्षांपासून राहत असून सदर भागात प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. यादी भाग क्र. २४२ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सदर नाव वगळणीबाबत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. तसेच नमूना क्र. ७ अर्जावरील स्वाक्षरी वादी यांची नसून त्रयस्त व्यक्तीकडून नमूना क्र.७ अर्ज दाखल करून सदरची वगळणी करण्यात आली आहे. त्याबाबत कोणतीही सूचना किंवा म्हणणे मांडण्याची संधी तक्रारदारास देण्यात आली नाही. त्यामुळे, त्यांनी आपली खंतही व्यक्त केली होती. अखेर निवडणूक आयोगाने त्यांची चूक मान्य केली आहे.

सुधीर रामचंद्र भगत या नावाच्या दोन भिन्न व्यक्ती असून अनवधानाने वादी यांचे नाव वगळले गेले आहे, असे मतदार नोंदणी अधिकारी यांनी म्हटले. वादी यांना नाव वगळलेबाबत ज्ञात नसल्याने त्यांनी मुदतीत अपील दाखल केले नाही. त्यामुळे, त्यांचा विलंब माफ करत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. वादी यांचे नाव सन १९९५ पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पर्यंत १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचे दिसून येते, असेही जिल्हा प्रशासनाने मान्य केलं आहे.

राबोडी पोलिसांची उत्तम कामगिरी; तांत्रिक कौशल्याने हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत

राबोडी पोलिसांची उत्तम कामगिरी; तांत्रिक कौशल्याने हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत पोलीस महानगर नेटवर्क ठाणे :…

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची ठाणे सायबर सेलला भेट

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची ठाणे सायबर सेलला भेट पोलीस महानगर नेटवर्क ठाणे…

“व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाणे पोलीस–नागरिक संवाद अधिक मजबूत

“व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाणे पोलीस–नागरिक संवाद अधिक मजबूत पोलीस महानगर नेटवर्क ठाणे…

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत घोडबंदर रोडवरील रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीत मोठा बदल

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत घोडबंदर रोडवरील रात्री ११ ते पहाटे…

ठाणे रेल्वे स्थानकात तरुणीसोबत विनयभंगाचा धक्कादायक प्रकार; दिव्यातून ५८ वर्षीय आरोपीला अटक

ठाणे रेल्वे स्थानकात तरुणीसोबत विनयभंगाचा धक्कादायक प्रकार; दिव्यातून ५८ वर्षीय आरोपीला अटक योगेश पांडे / वार्ताहर…

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मेफेड्रोन विक्री करणारे रॅकेट उध्वस्त, जवळपास १.०१ कोटींचा एम.डी. जप्त

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मेफेड्रोन विक्री करणारे रॅकेट उध्वस्त, जवळपास १.०१ कोटींचा एम.डी. जप्त…

ठाणे–मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी व लोकलमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत; ९ मोबाईल जप्त, ७ गुन्ह्यांचा उलगडा

  ठाणे–मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी व लोकलमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत; ९ मोबाईल जप्त, ७ गुन्ह्यांचा उलगडा…

कापूरबावडी पोलिसांचा उपक्रम; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ड्रग अवेअरनेसचे मार्गदर्शन

कापूरबावडी पोलिसांचा उपक्रम; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ड्रग अवेअरनेसचे मार्गदर्शन पोलीस महानगर नेटवर्क ठाणे : कापूरबावडी…

Right Menu Icon