“व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाणे पोलीस–नागरिक संवाद अधिक मजबूत

Spread the love

“व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाणे पोलीस–नागरिक संवाद अधिक मजबूत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे — ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या “Visit My Police Station” या अभिनव सामुदायिक उपक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, सामाजिक संस्था, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत पोलीस कार्यप्रणालीची माहिती घेतली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश;

• पोलिस–नागरिक संवाद वाढवणे
• तक्रारींचे त्वरित निराकरण
• कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणे
• सामुदायिक पोलिसिंगला बळ देणे

पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाज, गुन्हे शाखेची प्रक्रिया, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि विविध विभागांची समन्वय प्रणाली याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांनीही आपल्या शंका, सूचना आणि अपेक्षा मांडत परस्पर सहकार्याची भावना दृढ केली.

या उपक्रमामुळे विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्य या तिन्ही स्तरांवर पोलीस–नागरिक नाते अधिक दृढ झाले असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. ठाणे पोलीस आयुक्तालयाचा हा उपक्रम समाजातील सुरक्षितता आणि सकारात्मक संवादासाठी नवी दिशा देणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon