इंडिगो विमानात ‘धोका’ची नोट सापडल्याने खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा

Spread the love

इंडिगो विमानात ‘धोका’ची नोट सापडल्याने खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणासाठी सज्ज असलेल्या IndiGoच्या विमानात टिश्यू पेपरवर ‘धोका’ असा मजकूर आढळल्याने बुधवारी खळबळ उडाली. या प्रकरणी मुंबई पोलीस यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी येथील विमानतळावर इंडिगोची फ्लाइट उड्डाणासाठी तयार असताना विमानाच्या शौचालयात एका टिश्यू पेपरवर ‘धोका’ असा उल्लेख आणि मानवी खोपडीचे चित्र आढळले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, विमानाची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ही घटना समाजकंटकाचे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात असून, विमानतळावरील सेवा सुरळीत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon