कापूरबावडी पोलिसांचा उपक्रम; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ड्रग अवेअरनेसचे मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वतीने होली ट्रिनिटी स्कूल (आर मॉल शेजारी) येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा-जागरूकता मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, मोबाईलचा अतिवापर आणि ड्रग अवेअरनेस या विषयांवर विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या मार्गदर्शन सत्रात पोउनि. ढोकणे साहेब, विश्वनाथ बिवलकर ( ईगल ब्रिगेड फाउंडेशन) आणि पो.ह. गर्जे
यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांद्वारे विविध धोके आणि त्यावरील उपाय स्पष्ट केले.
१०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुरक्षा, स्वसंरक्षण आणि जागरूकतेचा संदेश आत्मसात केला.
सुरक्षित विद्यार्थी म्हणजे सुरक्षित समाज — कापूरबावडी पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम!