ठाणे–मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी व लोकलमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत; ९ मोबाईल जप्त, ७ गुन्ह्यांचा उलगडा

Spread the love

 

ठाणे–मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी व लोकलमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत; ९ मोबाईल जप्त, ७ गुन्ह्यांचा उलगडा

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे व मुंबई शहरातील गर्दीच्या भागात तसेच लोकल ट्रेनमधून मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे पथकाने अटक करत मोठी कामगिरी केली आहे. अटक आरोपीकडून ॲपल, सॅमसंग, विवो, रेडमी अशा विविध कंपन्यांचे एकूण ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

१६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रारदाराचा मोबाईल स्टेशन रोड, ठाणे मार्केट परिसरातून चोरीस गेल्याची तक्रार नोंद झाली होती. हा गुन्हा (गु.रजि.क्र. ६७८/२०२५, कलम ३०३(२), भा.न्या.सं. २०२३) दाखल असताना गुन्हे शाखेकडे आरोपीबाबत खात्रीशीर माहिती पोहवा गणेश बडगुजर यांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने महात्मा फुलेनगर, कळवा येथे सापळा रचून रफिक मोहम्मद शेख (वय ४४, रा. मुंब्रा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तीन अॅपल आयफोन मिळाले. त्यापैकी एक आयफोन हा ठाणेनगर गुन्ह्यातील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस २२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयीन कस्टडीनंतर पुढील तपासात आरोपीने राबोडी पो.स्टे. गु.रजि.क्र. ४६१/२०२५ मधील मोबाईल चोरी देखील केल्याची कबुली दिली.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने आरोपीला ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात आला. कौशल्यपूर्ण तपासात आरोपीने कापुरबावडी, कुर्ला रेल्वे पो.स्टे., बांद्रा, बांद्रा रेल्वे पो.स्टे., ठाणे रेल्वे पो.स्टे. या ठिकाणीही मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले.

पथकाने आरोपीकडून एकूण ₹१,२०,९९०/- किमतीचे ७ मोबाईल फोन हस्तगत केले असून उर्वरित दोन मोबाईल बाबत तपास सुरू आहे.

उघडकीस आलेले गुन्हे (सारांश):

ठाणेनगर पो.स्टे. – गु.रजि.क्र. ०६७८/२०२५

कुर्ला रेल्वे पो.स्टे. – गु.रजि.क्र. १०९७/२०२५

बांद्रा रेल्वे पो.स्टे. – गु.रजि.क्र. ०४२६/२०२५

ठाणे रेल्वे पो.स्टे. – गु.रजि.क्र. ११९५/२०२५

राबोडी पो.स्टे. – गु.रजि.क्र. ०४६१/२०२५

कापुरबावडी पो.स्टे. – गु.रजि.क्र. ०८४१/२०२५

बांद्रा पो.स्टे. – गु.रजि.क्र. १९२०/२०२५

सदर कारवाई पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व त्यांच्या पथकातील अधिकारी–अंमलदार यांनी केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon