राबोडी पोलिसांची उत्तम कामगिरी; तांत्रिक कौशल्याने हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नागरिकांच्या सेवेसाठी ठाणे पोलीस नेहमी तत्पर! याची पुन्हा एकदा प्रचिती राबोडी पोलीस ठाण्याने दिली आहे. तांत्रिक कौशल्याचा योग्य उपयोग करून नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यात राबोडी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून संबंधित मोबाईल त्यांच्या मालकांकडे सुखरूप परत करण्यात आले आहेत.
हरवलेले मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून राबोडी पोलिसांच्या कार्याचे कौतुक देखील केले आहे. तांत्रिक शाखेच्या मदतीने केलेल्या या कामगिरीमुळे ठाणे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ठाणे पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पोलीस दल नेहमीच सज्ज आणि तत्पर आहे.