कोल्हापुर Archives - Police Mahanagar

सुनावणीनंतर वाद चिघळला; जातिवाचक शिवीगाळप्रकरणी १५ वकिलांवर गुन्हा
सुनावणीनंतर वाद चिघळला; जातिवाचक शिवीगाळप्रकरणी १५ वकिलांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : कौटुंबिक वादातील खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालय परिसरात झालेल्या वादातून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आल्याने जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह १५ वकिलांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार नोंदविण्यात आला.

वारणा कोडोली (ता. पन्हाळा) येथील अश्विनी ऊर्फ पल्लवी निखिल पाटील (वय ३०) यांनी या प्रकरणी सर्किट बेंचकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना फिर्याद नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

७ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान अश्विनी पाटील आणि ॲड. काजल शेळके यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर काही वकिलांनी एकत्र येत फिर्यादी पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाटील यांना आमच्या हवाली करण्याची मागणीही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी जातिवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याविरोधातही शाहूपुरी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्किट बेंचच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह १५ जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.

The post सुनावणीनंतर वाद चिघळला; जातिवाचक शिवीगाळप्रकरणी १५ वकिलांवर गुन्हा appeared first on Police Mahanagar.

सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – कोल्हापूमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात सात बारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलंय. शिंगणापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच या दोघांनी मिळून हि लाच घेतल्याची माहिती आहे. इरफान सनदी आणि दीपक कांबळे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. दहा हजार पैकी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना हि कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींच्या घरांची देखील झाडाझडती घेतली. यात बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

The post सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं appeared first on Police Mahanagar.

कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अटक; ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अटक; ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी नागरिक वामकुक्षी घेत असताना हळूच दबक्या पावलांनी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. साने गुरुजी वसाहतीतील देवणे गल्ली येथील मानसी लक्ष्मीकांत खरे (५०) या महिलेच्या चौकशीतून तीन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, तिच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

मानसी खरे ही दुपारच्या वेळी कोल्हापूर शहरातील घरी दबक्या पावलांनी शिरायची. जेवण आणि विश्रांतीच्या वेळी अनेक घरांचे मुख्य दरवाजे फक्त ओढलेले असतात. याचाच फायदा घेऊन ती घरात शिरून थेट देवघर गाठत असत. तिथे चांदीच्या मौल्यवान मूर्ती, निरंजने आणि इतर पूजेचे साहित्य लंपास करून पसार होत असे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या या वेगळ्या चोरीच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

या प्रकरणाची सुरुवात २३ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवार पेठेतील उदय मधुकर देवरूखकर (६५) यांच्या घरी झालेल्या चोरीने झाला. दुपारी उघड्या दरवाजातून शिरलेल्या चोरट्याने देवघरातील सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्ती, सोन्याच्या किरीट आणि पाचू मणी असा ऐवज लंपास केला होता. यानंतर उत्तरेश्वर पेठेतील ज्योती किरण मगदूम (४३) यांच्या घरीही अशाच प्रकारची चोरी झाली. देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि पैंजण जोड चोरीला गेला होता.

या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा छडा लावला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलेची माहिती मिळाली. २१ फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मानसी खरेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, किशोर पवार आणि तानाजी देवणे यांच्या पथकाने केली. शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलीसांनी दिलं आहे. मानसीचा आणखी कुठल्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू असून, तिच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर सुरक्षा वाढवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

The post कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अटक; ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त appeared first on Police Mahanagar.

लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, ४० लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, ४० लाखांची देशी दारू जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी कारवाई करत ६२.५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीची ४० लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाने पकडली. ही दारू गोव्यात तयार करण्यात येत होती, पण त्यावर लेबल महाराष्ट्राचे लावून विक्रीसाठी आणली जात होती.सदर कारवाईमध्ये शंकर सीताराम आंबेकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, प्रमोद खरत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्र. २ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक ए. आर. नायकुडे, पी. डी. नागरगोजे, डी. बी. गवळी, सचिन काळेल, लक्ष्मण येडगे, केतन दराडे तसेच निरीक्षक गडहिंग्लज व भरारी पथक क्रमांक २ चे कर्मचारी यांनी भाग घेतला.

कागलमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, देवगड–निपाणी राज्य महामार्गावरील बसवडे फाटा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच -४०-सीएम -२५३५ क्रमांकाच्या टाटा मोटर्स कंपनीच्या १५१२/एलपीटी ट्रकची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये पुढील बाजूस देशी दारूचे बॉक्स आणि मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे बॉक्स आढळून आले.

तपासणीमध्ये ‘रॉकेट देशीदारू संघ’ या ब्रँडच्या एकूण १००० बॉक्स देशी दारू सापडली. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या असल्याने एकूण ९ लाख दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूच्या बाटल्यांवर प्रकार डिस्टिलरी प्रा. लि., राहाता, जि. अहमदनगर असा उल्लेख असला तरी प्राथमिक चौकशीत ही दारू गोवा राज्यात तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.कारवाईत दारू, पाण्याचे बॉक्स, ट्रक, मोबाईल फोन आणि कागदी बॉक्स असा एकूण ६२,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ट्रकची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे.

या प्रकरणी ट्रक चालक सलीम खयूम शेख आणि क्लिनर सूरज तेजराव सावंत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949, भारतीय न्याय संहिता 2023 आणि ट्रेड मार्क अ‍ॅक्ट 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

The post लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, ४० लाखांची देशी दारू जप्त appeared first on Police Mahanagar.

पुण्यातील येरवडा जेलमध्ये दोन कैद्यांची झाली दोस्ती, बाहेर आल्यावर दोघांनी मिळून केला मोठा कांड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
पुण्यातील येरवडा जेलमध्ये दोन कैद्यांची झाली दोस्ती, बाहेर आल्यावर दोघांनी मिळून केला मोठा कांड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – पुण्यातील येरवडा जेलमधून चार महिन्यांच्या कैदेनंतर बाहेर पडलेल्या दोन कुख्यात चोरट्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात धुमाकूळ घातला. आदमापूर येथील शेतात काम करणाऱ्या दोन महिलांकडून पाणी मागण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने हिसकावून त्यांनी पोबारा केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळून या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांची किंमत असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याआधीच त्यांच्या रेकॉर्डवर डझनभर गुन्हे नोंदवले गेले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या संशयितांची नावे राम ज्ञानोबा केंद्रे (२७) आणि मनोज शिवाजी लंगडे (३४) अशी आहेत. हे दोघे चार महिन्यांपूर्वी पुण्यातील चोरीच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये कैदेत होते. तिथे झालेल्या ओळखीतून बाहेर पडल्यानंतर एकत्र चोऱ्या करण्याचा कट त्यांनी रचला. जामीन मंजूर होताच २ डिसेंबर रोजी एसटीने कोल्हापुरात दाखल झाले आणि चोरीच्या उद्देशाने भुदरगड तालुक्यातील आदमापूरकडे वळले.

चार दिवस मंदिर परिसरात मुक्काम करून गर्दीत चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी गावापासून दूर खळखळीचा माळ येथील शेताकडे लक्ष केंद्रित केले. दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पाणी पिण्याच्या बहाण्याने शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले (६७) आणि लक्ष्मी दिनकर पाटील यांच्याकडे जाऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि अर्धा तोळा वजनाची एकसर माळ हिसकावली. या जबरी चोरीप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला. पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पानाच्या टपरीजवळ त्यांचा वावर असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले, की राम केंद्रे याच्यावर पुणे, रायगड, लातूर, सोलापूरसह भुदरगडमधील दोन गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे. तर मनोज लंगडे याच्यावर पुणे शहर, कोंडवा आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दोघांनीही आदमापूर येथील चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून २ लाख ७० हजार किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार राजू कोरे, योगेश गोसावी, अमित सर्जे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. पुढील तपासासाठी संशयितांना भुदरगड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले, की या चोरट्यांच्या रेकॉर्डमधून आणखी गुन्हे उघडकीस येतील तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

The post पुण्यातील येरवडा जेलमध्ये दोन कैद्यांची झाली दोस्ती, बाहेर आल्यावर दोघांनी मिळून केला मोठा कांड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या appeared first on Police Mahanagar.

कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर
कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा आज पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ हा अपघात घडला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

The post कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर appeared first on Police Mahanagar.

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसवर दरोडा; एक कोटींचे दागिने लंपास
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसवर दरोडा; एक कोटींचे दागिने लंपास

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या एका खाजगी प्रवासी बसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकू व कोयत्याचा धाक दाखवून दरोडेखोरांनी बसमधील प्रवाशांकडील सुमारे एक कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास किणी टोलनाक्याजवळ घडली. सात ते आठ जणांच्या टोळीने बस अडवून आत प्रवेश केला. त्यानंतर शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांना धमकावून त्यांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने काढून घेतले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरोड्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर–मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

The post कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसवर दरोडा; एक कोटींचे दागिने लंपास appeared first on Police Mahanagar.

जमीन वाटणीच्या वादातून डॉक्टर मुलीचा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला; बोटाचा मोठा तुकडा चावून तोडला
जमीन वाटणीच्या वादातून डॉक्टर मुलीचा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला; बोटाचा मोठा तुकडा चावून तोडला

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – वडिलोपार्जित जमीन वाटणीच्या वादातून पेशाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे. दुचाकी घालून लाथाबुक्की केली आणि बोटाचा मोठा तुकडा चावून तोडून टाकल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. गिजवणे गावात ही घटना घडली आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावात झालेल्या या हल्ल्यामध्ये ७८ वर्षीय गणपतराव विष्णू हाळवणकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणात मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (४३) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतराव हाळवणकर आणि त्यांच्या दोन मुलींमध्ये मालमत्तेच्या वाटणीसंबंधी वाद गेल्या काही काळापासून सुरू होते. पैशाच्या मुद्द्यावरून ११ आणि १४ नोव्हेंबर रोजी शुभांगीकडून शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार झाल्याची तक्रार देखील गणपतरावांनी केली होती. या पार्श्वभूमीवर देखील हा वाद शांत न होता अजूनच वाढत गेला आणि गणपतराव यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात बदलला.

रविवारी सायंकाळी गणपतराव फिरण्यासाठी बाहेर निघाले असता गिजवणे ते गडहिंग्लज रोडवरील पेट्रोलपंपाजवळ त्यांना त्यांच्या मुलीने अडवले. दुचाकीवरून येऊन त्यांच्या अंगावर दुचाकी घातली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर शुभांगीने आपल्याच वडिलांना शिवीगाळ केली, “माझ्याविरुद्ध तक्रार केली, तर तुला जिवंत सोडणार नाही” असा इशारा दिला. या वेळी तिने डोक्याला, छातीवर लाथा मारल्या आणि हातानेही मारहाण केली.

रागात मारहाण करताना गणपतराव यांनी हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीने आपल्या वडिलांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या तर्जनी बोटाचा जोराचा चावा घेतला. त्यामुळे बोटाचा पुढील भाग तुटून मोठा रक्तस्त्राव झाला. या गंभीर घटनेची माहिती गणपतराव यांनी तात्काळ मुलगा उदय हाळवणकर (३६) याला दिली. उदय यांनी घटनास्थळी पोहोचून वडिलांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर येथे दाखल करण्यात आले. सध्या गणपतराव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

उदय हाळवणकर यांनी आपल्या बहिणीविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हवालदार डी. एन. पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ही घटनेने समाजात मोठी खळबळ उडवून दिली असून, वडिलोपार्जित मालमत्तेतील वादामुळे किती मोठ्या कलहाला तोंड फुटू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे प्रकरणाची पुढील कारवाई कशी होईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

The post जमीन वाटणीच्या वादातून डॉक्टर मुलीचा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला; बोटाचा मोठा तुकडा चावून तोडला appeared first on Police Mahanagar.

इसेंस वापरून बनावट दारू तयार करणारे रॅकेट उघडकीस; पेठवडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
इसेंस वापरून बनावट दारू तयार करणारे रॅकेट उघडकीस; पेठवडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे धडक कारवाई करत बनावट दारू बनवणारे रॅकेट उघडकीस आणले. कारवाईदरम्यान इसेंस, कॅरॅमल, अवैध मध्यार्क आणि विविध साहित्यांसह एकूण ६ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या छापेमारीत रंजीत प्रकाश कांबळे (वय ४०) या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान कांबळे याने पोलिसांसमोर इसेंस वापरून काही क्षणांत वेगवेगळे ब्रॅण्ड तयार कसे केले जातात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दिले. त्यावरून बनावट दारूचे संपूर्ण जाळे कसे कार्यरत होते, हे स्पष्ट झाले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने केली. परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री सुरु असल्याच्या माहितीवरून ही छापेमारी करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

The post इसेंस वापरून बनावट दारू तयार करणारे रॅकेट उघडकीस; पेठवडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई appeared first on Police Mahanagar.

कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापुर – कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलांनी हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला सुधारगृहात घडलेल्या या प्रकारानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रिसॉर्टवर अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर वारंवार कारवाई झाल्यानंतर कोर्टाने संबंधित महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला सुधारगृहात होत्या. मात्र, त्या ठिकाणाहून जामीन मिळावा याच्यासाठी वारंवार अर्ज करत होत्या. मात्र, त्यांना जामीन मिळत नसल्याने नैराश्यामध्ये येऊन त्यांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या सगळ्या पीडितांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.

दरम्यान, नंदगाव येथे बारशाच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम लावून नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोन नृत्यांगनासह सहा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदगाव येथील गायरान परिसरात गेली दहा ते पंधरा वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने परजिल्ह्यातून दोन कुटुंबे स्थायिक झाली आहेत. यातील एका कुटुंबात बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी साऊड सिस्टीम लावून गाण्याच्या तालावरती दोन तरुणींसोबत काही तरुण अश्लील नृत्य करीत होते. याचा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली. गावातील तरुणांनी एकत्रित येऊन घटनास्थळाकडे मोर्चा वळविला. इतक्यात इस्पूर्ली पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्दसर शेख यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळावरुन दोन नृत्यांगनासह सहा तरुणांना ताब्यात घेतले.

The post कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न appeared first on Police Mahanagar.