सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
योगेश पांडे / वार्ताहर
कोल्हापूर – कोल्हापूमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात सात बारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलंय. शिंगणापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच या दोघांनी मिळून हि लाच घेतल्याची माहिती आहे. इरफान सनदी आणि दीपक कांबळे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. दहा हजार पैकी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना हि कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींच्या घरांची देखील झाडाझडती घेतली. यात बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.