कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

Spread the love

कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

योगेश पांडे / वार्ताहर 

कोल्हापुर – कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलांनी हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला सुधारगृहात घडलेल्या या प्रकारानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रिसॉर्टवर अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर वारंवार कारवाई झाल्यानंतर कोर्टाने संबंधित महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला सुधारगृहात होत्या. मात्र, त्या ठिकाणाहून जामीन मिळावा याच्यासाठी वारंवार अर्ज करत होत्या. मात्र, त्यांना जामीन मिळत नसल्याने नैराश्यामध्ये येऊन त्यांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या सगळ्या पीडितांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.

दरम्यान, नंदगाव येथे बारशाच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम लावून नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोन नृत्यांगनासह सहा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदगाव येथील गायरान परिसरात गेली दहा ते पंधरा वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने परजिल्ह्यातून दोन कुटुंबे स्थायिक झाली आहेत. यातील एका कुटुंबात बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी साऊड सिस्टीम लावून गाण्याच्या तालावरती दोन तरुणींसोबत काही तरुण अश्लील नृत्य करीत होते. याचा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली. गावातील तरुणांनी एकत्रित येऊन घटनास्थळाकडे मोर्चा वळविला. इतक्यात इस्पूर्ली पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्दसर शेख यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळावरुन दोन नृत्यांगनासह सहा तरुणांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon