अमरावती Archives - Police Mahanagar

अमरावती क्राइम ब्रांचचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : राजस्थानपर्यंत पोहोचत आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड
अमरावती क्राइम ब्रांचचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : राजस्थानपर्यंत पोहोचत आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतून उघडकीस आलेल्या एमडी (मेफेड्रोन) तस्करी प्रकरणाचा तपास करत अमरावती क्राइम ब्रांचने थेट राजस्थानातील उत्पादन कारखान्यावर धाड टाकत आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा मोठा भंडाफोड केला. या कारवाईत मुख्य सूत्रधार मांगीलाल गनपत सिंघावत (वय ४५, डिंडवाना, राजस्थान) आणि त्याचा साथीदार विष्णु गायरी यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची सुरुवात ८ मार्च रोजी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी अब्दुल फहीम आणि शेख अयान यांना २.७९ किलो एमडी ड्रग्ससह अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तपासाची दिशा मुंबईतील मुख्य तस्कर अजीमकडे वळली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत राजस्थानातील दुर्गम भागातील कारखान्यापर्यंत पोहोच साधली.

क्राइम ब्रांचच्या पथकाने गेल्या महिनाभरात सुमारे ४,००० किलोमीटरचा प्रवास करत गुप्तपणे तपास मोहीम राबवली. बीहड परिसर, दुर्गम भाग आणि अरुंद गल्लीबोळांमध्ये संशयितांचा पाठलाग करून अखेर मांगीलाल आणि विष्णु यांना जेरबंद करण्यात यश आले.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे देशभर पसरलेल्या ड्रग्स माफियांच्या जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवानी बचाटे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी केले. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

The post अमरावती क्राइम ब्रांचचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : राजस्थानपर्यंत पोहोचत आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड appeared first on Police Mahanagar.

रस्त्यात अडवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; अमरावतीतील संतापजनक घटना, पाच आरोपींना अटक
रस्त्यात अडवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; अमरावतीतील संतापजनक घटना, पाच आरोपींना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यातील चांदुर रेल्वे रोडवरील भानखेडा फाटा परिसरात १९ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी रात्री ८ ते साडेनऊच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या मित्रासह भानखेडा फाटा परिसरातून जात होती. यावेळी पाच आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुणीच्या मित्राला मारहाण करून दोरखंडाने त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर आरोपींनी आळीपाळीने तरुणीवर अत्याचार केला.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच रात्री पाचही आरोपींना अटक केली. मात्र तपासाच्या कारणास्तव आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे नागरिक आणि विविध संघटनांमध्ये संताप व्यक्त होत होता. अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (३४), दीपक मरसकोल्हे (२९), प्रमोद नारायण वाघाडे (३९), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (२८) आणि उमेश बेनीराम भोयर यांचा समावेश आहे. शनिवारी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले.

दरम्यान, या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना आणि नागरिक आक्रमक झाले असून, प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

The post रस्त्यात अडवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; अमरावतीतील संतापजनक घटना, पाच आरोपींना अटक appeared first on Police Mahanagar.

अमरावती आयुक्तालयात शीघ्र कृती दल जवानाची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
अमरावती आयुक्तालयात शीघ्र कृती दल जवानाची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या (QRT) जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.

The post अमरावती आयुक्तालयात शीघ्र कृती दल जवानाची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ appeared first on Police Mahanagar.

दहावी पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट आमदार–खासदारांपर्यंत; आरोपीसाठी लावला होता वशिला
दहावी पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट आमदार–खासदारांपर्यंत; आरोपीसाठी लावला होता वशिला

योगेश पांडे / वार्ताहर

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे दहावीच्या उत्तरपत्रिकांमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांचे थेट लोकप्रतिनिधींशी संबंध असल्याचे समोर आले असून, त्यांना पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यासाठी शिफारस पत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर संपल्यानंतर उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या पथकाने अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या कस्टडीला अचानक भेट दिली. तपासणीदरम्यान दोन उत्तरपत्रिका कमी असल्याचे आढळून आले. याच वेळी अनिल हाडोळे नावाचा व्यक्ती शर्टखाली कमरेत उत्तरपत्रिका लपवून आत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पथकाच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

या प्रकरणी पोलिसांनी १ मार्च रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, खोडे व हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे.

या घोटाळ्यातील आणखी गंभीर बाब म्हणजे, आरोपी सुधीर खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार मिळावा यासाठी थेट राजकीय पातळीवरून शिफारस करण्यात आल्याचे समोर आले आहे. बळवंत वानखडे यांनी ३ मार्च २०२५ रोजी, तर गजानन लवटे यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांना पत्र लिहून खोडे यांना पदभार देण्याची शिफारस केली होती. या पत्रांनंतरच खोडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याची अधिकृत कागदपत्रे आता समोर आली आहेत.

सुधीर खोडे यांची मूळ नियुक्ती पंचायत समिती अमरावती येथे असताना त्यांना तब्बल ८१ किलोमीटर अंतरावरील अंजनगाव सुर्जीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला विरोध दर्शवत, अमरावतीहून अंजनगाव सुर्जीचे कामकाज पाहणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत राजकीय दबावाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री कार्यालयाकडेही करण्यात आली होती. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दहावीच्या पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्याने, आता पोलिसांकडून या दिशेने सखोल तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post दहावी पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट आमदार–खासदारांपर्यंत; आरोपीसाठी लावला होता वशिला appeared first on Police Mahanagar.

बनावट ‘फोन पे’ ॲपद्वारे सराफा व्यावसायिकाची फसवणूक; दोन सराईत गुन्हेगार अटकेत
बनावट ‘फोन पे’ ॲपद्वारे सराफा व्यावसायिकाची फसवणूक; दोन सराईत गुन्हेगार अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : सोन्याची अंगठी खरेदी केल्यानंतर बनावट ‘फोन पे’ ॲपवरून पैसे भरल्याचे भासवून सराफा व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून सोन्याची अंगठी आणि दुचाकीसह एकूण १.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंजनगाव सुर्जी येथील गोपाल नगर भागात राजेश जानराव बैतुले यांचे ‘गुणगुण ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी दोन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्याचा बहाणा करत ४८ हजार रुपये किमतीची ३.३२० ग्रॅम वजनाची अंगठी पसंत केली. पैसे देताना आरोपींनी मोबाईलवरील बनावट ‘फोन पे’ ॲपवर व्यवहार यशस्वी झाल्याचे दाखवले आणि पैसे खात्यात जमा झाल्याचा आभास निर्माण करून दुचाकीवरून पसार झाले. काही वेळाने बँक खाते तपासल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बैतुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून महाजनपुरा परिसरातून उमेर मिर्झा जाफर बेग मिर्झा (३६, रा. सागर नगर, हैदरपुरा) आणि मोहम्मद शोएब मोहम्मद शकील (३६, रा. नालसाबपुरा, अमरावती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून यापूर्वी नागपूर व वाशीम जिल्ह्यातही अशाच प्रकारे व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या कारवाईमुळे बनावट पेमेंट ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, डिजिटल व्यवहार स्वीकारताना केवळ ग्राहकाच्या मोबाईल स्क्रीनवर विश्वास न ठेवता, स्वतःच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस प्राप्त झाला आहे का, अथवा बँकेच्या अधिकृत ॲपमध्ये व्यवहाराची नोंद दिसते का, याची खात्री केल्यानंतरच माल देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना केले आहे.

The post बनावट ‘फोन पे’ ॲपद्वारे सराफा व्यावसायिकाची फसवणूक; दोन सराईत गुन्हेगार अटकेत appeared first on Police Mahanagar.

अमरावतीत पोलिसांवर खुनाचा गुन्हा; आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
अमरावतीत पोलिसांवर खुनाचा गुन्हा; आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती – चांदुररेल्वे पोलीस ठाण्यातील कोठडीत रितेश मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला असून, संबंधित सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

५ जून २०२५ रोजी रितेश मेश्राम यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला होता. संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आणि चुकीच्या वर्तणुकीचा आरोप करत न्यायाची मागणी केली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनुसूचित जाती आयोगाने स्वतःहून चौकशी सुरू केली. आयोगाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीच्या वर्तणुकीमुळे रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयोगाने न्यायालयासमोर सविस्तर अहवाल सादर केला.

न्यायालयीन चौकशीत गार्ड इंचार्ज आणि गार्ड ड्युटीवरील पोलिसांना जबाबदार धरले गेले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे :

राजकुमार मुलामचंद जैन, विशाल मुकुंदराव रंगारी, अश्विनी शामरावजी आखरे, सरिता वैद्य, प्रविण रामदास मेश्राम, अलीम हकीम गवळी, अमोल अमृतराव घोडे आणि प्रशांत ढोके.

दरम्यान, या प्रकरणातील तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आरोपी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

The post अमरावतीत पोलिसांवर खुनाचा गुन्हा; आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन appeared first on Police Mahanagar.

भाजप नेत्या नवनीत राणा यांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू
भाजप नेत्या नवनीत राणा यांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

अमरावती – अमरावतीतील भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यांना पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना यावेळी जीवे मारण्याची आणि गँगरेप करण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. यात त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टच्या माध्यमातून थेट नवनीत राणा यांच्या अमरावती येथील कार्यालयात पाठवण्यात आले आहे. हे पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीकडून पाठवण्यात आले आहे. या पत्रात अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या स्तराचे शब्द वापरले असून, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे.

नवनीत राणा यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार चिंता व्यक्त केली गेली आहे.या गंभीर धमकीच्या घटनेनंतर नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी तातडीने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला असून, पत्रातील मजकूर आणि ते कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले आहे. याचा शोध राजापेठ पोलिसांकडून सुरु आहे.

The post भाजप नेत्या नवनीत राणा यांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू appeared first on Police Mahanagar.

पथ्रोटमध्ये धक्कादायक खून : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा केला खून
पथ्रोटमध्ये धक्कादायक खून : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा केला खून

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीत काल रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. पतीच्या आड येणाऱ्या अनैतिक संबंधांचा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृताचे नाव अरविंद सुरतणे (वय ३७) असे असून, तो पथ्रोटमधील झेडा चौकात बाभुळकर यांच्या घरात भाड्याने राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदची पत्नी शेजारील अमित लवकुश मिश्रा (वय ३३) याच्या घरी स्वयंपाकासाठी नेहमी जात असे. या कारणामुळे दोघांमध्ये ओळख वाढली आणि ती हळूहळू अनैतिक संबंधांमध्ये परिवर्तित झाली.

याबाबत संशय आल्याने अरविंदने या संबंधांना विरोध दर्शविला. त्यानंतर संतापाच्या भरात पत्नी जोशना अरविंद सुरतणे हिने प्रियकर अमित मिश्रा याच्या मदतीने पतीचा खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी अमित मिश्रा थेट पथ्रोट पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच्यासह मृताची पत्नी जोशनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन पुंडते करत आहेत. या खुनामुळे पथ्रोटसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

The post पथ्रोटमध्ये धक्कादायक खून : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा केला खून appeared first on Police Mahanagar.

तर विदर्भातील परमीट रूम्स बेमुदत बंद; करवाढीविरोधात बारचालक आक्रमक
तर विदर्भातील परमीट रूम्स बेमुदत बंद; करवाढीविरोधात बारचालक आक्रमक

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : राज्य शासनाच्या अन्यायकारक कर धोरणाविरोधात विदर्भातील बारचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला असून परमीट रूम्स बंद ठेवल्याने हॉटेल व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. मद्य विक्रीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढ, परवाना शुल्क वाढ आणि आयएमएफएलवरील (भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावरील) उत्पादन शुल्कवाढ यामुळे बार चालकांना व्यवसाय करणे परवडत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमरावती परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने व्हॅट ५ टक्क्यांवरून १० टक्के केला असून हा वाढीव कर केवळ बार चालकांवर लादण्यात आला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात १५ टक्के वाढ आणि आयएमएफएलवर तब्बल ६० टक्क्यांची उत्पादन शुल्कवाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील ४०० बार बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यावर अवलंबून असलेल्या १५ हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे मोहोड यांनी सांगितले.

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा परमीट रूम असोसिएशनच्या बैठकीत या मुद्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सरकारकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देऊनही व्हॅट रद्द करण्यात आला नसल्याने बारचालक आक्रमक झाले आहेत.

वाईन शॉप व देशी दारूची विक्री वाढली

बारमध्ये करवाढ झाल्यामुळे ग्राहकांनी वाईन शॉपमधून थेट बाटल्या खरेदी करून रस्त्यावर, धाब्यांवर, हातगाड्यांवर मद्यपान करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाईन शॉपची विक्री तिपटीने, तर देशी दारूची विक्री सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय नकली दारू, हातभट्टी आणि परराज्यातून तस्करी होणाऱ्या दारूचा महापूर आलेला असल्याचे मोहोड यांनी निदर्शनास आणले.

हॉटेल व्यवसाय डबघाईस

उच्च करामुळे परमीट रूम्स चालवणे अशक्य झाले असून कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे. हातभट्टी व नकली दारूमुळे अपघात किंवा दुर्घटना घडल्यास त्यास सरकार व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा असोसिएशनने दिला आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून कारवाई होऊनही खुल्या ठिकाणी मद्यसेवन सुरूच असल्याचे सांगून, गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास सरकारलाच हे संकट स्पष्ट दिसेल, असेही मोहोड यांनी स्पष्ट केले. नागपूर येथील बैठकीस राजीव जयस्वाल, किशोर धारड, परविंदर सिंग भाटिया, पवनीकर, राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

The post तर विदर्भातील परमीट रूम्स बेमुदत बंद; करवाढीविरोधात बारचालक आक्रमक appeared first on Police Mahanagar.

अमरावतीतील “काफिला” हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; एम.डी., गांजा, विदेशी मद्यासह २.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावतीतील “काफिला” हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; एम.डी., गांजा, विदेशी मद्यासह २.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती – शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने मोठी कारवाई केली. एम.डी. (मॅफेडॉन), गांजा, विदेशी मद्य, हुक्का साहित्य आणि इतर असा एकूण २,८७,४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांशी हुज्जतबाजी करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींनाही अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, ९ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रायली प्लॉट, सतीधाम मंदिराजवळील प्रमेन्द्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या “काफिला” हुक्का पार्लरवर ही धाड टाकण्यात आली.

कारवाईदरम्यान काही ग्राहक हुक्का सेवन करताना आढळून आले. तपासात हुक्का पॉट, सुगंधित फ्लेवर तंबाखू, नळी, शेगळी, विदेशी मद्य, नगदी, मोबाइल, तसेच एका इसमाकडून ३ ग्रॅम एम.डी. आणि इतरांकडून २५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या वेळी आरोपी प्रमेन्द्र शर्मा, पंकज शर्मा, प्रणय शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी झोंबाझोंबी करून काही ग्राहकांना पळवून लावले. तरीही पोलिसांनी एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट, सिगारेट व तंबाखू उत्पादने नियंत्रण कायदा, तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा, पंकज जितेंद्र शर्मा, प्रणय प्रमेंद्र शर्मा (अमरावती), रमन पंडित वानखडे (यवतमाळ), तुषार मोतीराम मनोजा, आमीर हुसेन अशपाक हुसेन, यश सुधीर साखरे, राहुल अमरलाल ईसरानी, अभिषेक सुरेश गाभणे, वैभव राजेश जाधव, अजय बाळकृष्ण माहुले (सर्व अमरावती) काही अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमरावतीतील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर मोठा आघात बसला आहे. पोलिसांकडून अशा अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

The post अमरावतीतील “काफिला” हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; एम.डी., गांजा, विदेशी मद्यासह २.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Police Mahanagar.