अमरावतीतील “काफिला” हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; एम.डी., गांजा, विदेशी मद्यासह २.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

अमरावतीतील “काफिला” हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; एम.डी., गांजा, विदेशी मद्यासह २.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती – शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने मोठी कारवाई केली. एम.डी. (मॅफेडॉन), गांजा, विदेशी मद्य, हुक्का साहित्य आणि इतर असा एकूण २,८७,४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांशी हुज्जतबाजी करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींनाही अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, ९ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रायली प्लॉट, सतीधाम मंदिराजवळील प्रमेन्द्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या “काफिला” हुक्का पार्लरवर ही धाड टाकण्यात आली.

कारवाईदरम्यान काही ग्राहक हुक्का सेवन करताना आढळून आले. तपासात हुक्का पॉट, सुगंधित फ्लेवर तंबाखू, नळी, शेगळी, विदेशी मद्य, नगदी, मोबाइल, तसेच एका इसमाकडून ३ ग्रॅम एम.डी. आणि इतरांकडून २५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या वेळी आरोपी प्रमेन्द्र शर्मा, पंकज शर्मा, प्रणय शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी झोंबाझोंबी करून काही ग्राहकांना पळवून लावले. तरीही पोलिसांनी एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट, सिगारेट व तंबाखू उत्पादने नियंत्रण कायदा, तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा, पंकज जितेंद्र शर्मा, प्रणय प्रमेंद्र शर्मा (अमरावती), रमन पंडित वानखडे (यवतमाळ), तुषार मोतीराम मनोजा, आमीर हुसेन अशपाक हुसेन, यश सुधीर साखरे, राहुल अमरलाल ईसरानी, अभिषेक सुरेश गाभणे, वैभव राजेश जाधव, अजय बाळकृष्ण माहुले (सर्व अमरावती) काही अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमरावतीतील अवैध हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ विक्रीवर मोठा आघात बसला आहे. पोलिसांकडून अशा अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon