अमरावती आयुक्तालयात शीघ्र कृती दल जवानाची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Spread the love

अमरावती आयुक्तालयात शीघ्र कृती दल जवानाची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या (QRT) जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon