कुख्यात गँगस्टर रवी पुजारी ठाणे क्राइम ब्रांचच्या ताब्यात; मोक्का न्यायालयाकडून २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Spread the love

कुख्यात गँगस्टर रवी पुजारी ठाणे क्राइम ब्रांचच्या ताब्यात; मोक्का न्यायालयाकडून २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई/ठाणे : कुख्यात गँगस्टर रवी प्रकाश सुल्या पुजारी याला ठाणे क्राइम ब्रांचच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने अटक केली असून, जुन्या खंडणी प्रकरणात ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद असून सध्या मोक्का न्यायालयात प्रलंबित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पुजारी हा दीर्घकाळ फरार होता आणि परदेशातून गुन्हेगारी कारवाया चालवत होता. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. २०१९ साली त्याला सेनेगल येथे ताब्यात घेण्यात आले होते.

प्रॉडक्शन वॉरंटनुसार १७ मार्च २०२६ रोजी त्याला बेंगळुरू येथील कारागृहातून ठाण्यात आणण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली. त्याला आज मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे क्राइम ब्रांचचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon