भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; पत्नी आणि मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप

भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; पत्नी आणि मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी)यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय धुलचंद कारंडे असं सावेंच्या ओसडींचं नाव आहे, त्यांच्यावर पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० एप्रिल रोजी नवीन गार्डन या त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

क्वीन्स गार्डन निवासस्थानी पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅटबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. याचा राग कारंडे यांना आला आणि ते संतापले. त्यानंतर त्यांनी पत्नीला बॅटने मारहाण करायला सुरुवात केली. फक्त मारलंच नाही तर पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा ही आरोप आहे. आपल्या आईला वाचवण्यासाठी कारंडे यांचा मुलगा भांडणाच्या मध्ये गेला मात्र कारंडे यांनी त्याच्यावरही बॅटने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि मुलगा दोघेही स्वतःचा जीव वाचून घराबाहेर पडले.

त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारी वरून पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक दुखापत करणं, धमकी देणं यावरून गुन्हा दाखल केला आहे. करंडे हे नांदेड येथील समाज कल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईत मंत्रालयात ओबीसी कल्याण, ऊर्जामंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून प्रतिनियुतीवर काम करत आहे. मंत्र्याच्या ओसडीने केलेल्या या प्रकारामुळे घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

ही घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी घडली. पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅटबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. याचा राग कारंडे यांना आला आणि ते संतापले. या कारणावरून कारंडे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. कारंडे यांनी रागाच्या भरात पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मध्ये पडला असता, आरोपीने पोटच्या मुलालाही सोडले नाही आणि त्याच्यावरही बॅटने हल्ला चढवला. असे तक्रारी नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon