तरुणीच्या घरच्यांचा प्रेम संबंधाला विरोध; वारंवार मानसिक छळाला कंटाळून पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस शिपायाची आत्महत्या

Spread the love

तरुणीच्या घरच्यांचा प्रेम संबंधाला विरोध; वारंवार मानसिक छळाला कंटाळून पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस शिपायाची आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ वाकोला पोलीस कॅम्प परिसरात ही धक्कादाय घटना घडली आहे. मुंबईतल्या कलिना पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळं खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर आलं आहे.

भैय्यासाब भीमराव व्हावळे (३२) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांची नुकताच मुंबई पोलीस दलात भरती झाली होती. प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून या पोलीस शिपयाने आत्महत्या केल्याचं सुसाड नोट मध्ये लिहिले आहे. पोलीस शिपाई भैय्यासाब व्हावळे यांची ७ फेब्रुवारी २०२६ ला मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती, ते मूळचा परभणीचा रहिवासी होते.

१५ मार्च रोजी त्यांनी कलिना प्रशिक्षण केंद्रात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्या करण्यामागचे कारण लिहिले होते. या सुसाइड नोट मध्ये त्यांनी त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची नाव लिहिलं होती. या पोलिसाचे नांदेडच्या हदगावमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते, पण तरुणीच्या घरच्यांनी या प्रेम संबंधाला विरोध केला होता. त्यामुळे तिचे घरचे पोलीस भैय्यासाब व्हावळे याला जीवे ठार मारण्याचे आणि पोलीस दलातून सस्पेंड करण्याची धमकी देत मानसिक छळ करत होते. त्यासोबत पोलिसाच्या प्रेयसीच्या आईने तू आत्महत्या कर नाहीतर तुझी नोकरी घालू अशी धमकी दिली होती. मुलीचे आई-वडिलांनी तिचे दुसरीकडे लग्न लावण्याचे ठरवले होते. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे. या प्रकरणी पोलिसाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील वाकोला पोलिसांनी प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon