धारावीत मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ; हल्ल्यात जखमी अश्विन नाडार यांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : धारावी परिसरात घडलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अश्विन नाडार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, घटनेपूर्वी उपस्थितांनी मध्यस्थी करून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिक खान याच्याशी झालेल्या वादातून ही घटना घडली. परिस्थिती बिघडू नये यासाठी घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी पुढे येत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्हिडिओमध्ये काही जणांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र, हे प्रयत्न निष्फळ ठरले आणि आरोपीने हल्ला केल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नाडार यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।