वरिष्ठ नागरिकांसोबत खेळीमेळीची बैठक : ‘आधारवड’ अॅपविषयी मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : चितळसर पोलीस ठाणे आणि इगल ब्रिगेड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ नागरिकांसोबत खेळीमेळीची बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान पोलिस अधिकारी आणि श्री. विश्वनाथ बिवलकर (इगल ब्रिगेड फाऊंडेशन) यांनी ठाणे पोलिसांचे “आधारवड” या मोबाइल अॅप्लिकेशनची माहिती देत वरिष्ठ नागरिकांना सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमातून वरिष्ठ नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, “आधारवड” अॅपच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.