विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जागरूकता सत्र; १५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Spread the love

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जागरूकता सत्र; १५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक व सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल येथे विशेष सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षितता, सायबर सुरक्षितता, ‘गुड टच–बॅड टच’, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सहाय्य प्रणालींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घटना आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon