नाशिकमध्ये १० हजारांसाठी पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. कैलास विश्वनाथ ठाकुर (वय ५६) असे लाच घेणाऱ्या निंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची इर्टिगा वाहन जप्त करण्यात आले होते. तक्रारदार यांचे जप्त वाहन सोडून देण्याच्या मोबदल्यात ठाकूर यांनी प्रथम १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. १२/०६/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगांव कार्यालयात तक्रार दिली. दि.१२/०६/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता ठाकूर यांनी प्रथम १५ हजार रुपये व तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दि. १२/०६/२०२४ रोजी ठाकूर यांना १० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर निंभोरा पोलीस ठाणे जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सुहास डी देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीमती नेत्रा एन जाधव, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ. दिनेशसिंग पाटील, पो. कॉ अमोल सूर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे, पो. हे. कॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. प्रणेश ठाकूर यांनी केली.