Police Mahanagar

न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार; खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोर्टात हजर केल्या नंतर जेलमध्ये जाताना फरार
न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार; खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोर्टात हजर केल्या नंतर जेलमध्ये जाताना फरार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयातून मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी हॅरिसन अँथनी जोसेफ (४२) हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. त्याने मोठ्या चलाखीने पोलीसांनी गुंगारा दिला. कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आता तो कोर्ट परिसरातून दिसेनासा झाला. त्यामुळे पोलीसांची एकच धांदल उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २:१० ते २:२० च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत श्रीमंत कांबळे (२८) हे आरोपी हॅरिसनला सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहातून सत्र न्यायालयात घेवून आले होते. त्याला कोर्टरूम क्रमांक १० मध्ये हजर ही करण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, हॅरिसनसह इतर चार आरोपींना न्यायालयाच्या लॉकअपमध्ये नेण्यासाठी पोलीस पथक तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होते. याच वेळी आरोपी हॅरिसने संधी साधली.

पोलिसांचे पथक दुसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, आरोपी हॅरिसनने पोलीस कर्मचाऱ्याला अचानक जोराचा धक्का दिला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिसांची पकड ढिली होताच त्याने तेथून पळ काढला. या घटनेची औपचारिक नोंद त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवाय त्याला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्ही मध्ये आरोपी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पळताना स्पष्ट दिसत आहे. आरोपीवर यापूर्वीच हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपी रेल्वेने पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचे एक पथक कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस कडे रवाना झाले आहे.

The post न्यायालयाच्या आवारात फिल्मीस्टाईल थरार; खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोर्टात हजर केल्या नंतर जेलमध्ये जाताना फरार appeared first on Police Mahanagar.

पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला
पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील गोवंडी परिसरात एका ३८ वर्षीय मजुराने आपल्या पत्नीला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. आपलं पितळ उघड झाल्याच्या रागातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीवर चाकूने हल्ला करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताचा अंगठा छाटला गेला.

पीडित व्यक्ती व्यवसायाने मजूर असून तो रविवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी कामाच्या ठिकाणी घराच्या चावीची गरज पडल्याने तो अचानक घरी परतला. घरी पोहोचल्यावर त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले आणि घराबाहेर एक अनोळखी चप्पल पडलेली दिसली. संशय आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी आणि जवळच राहणारा त्याचा मामेभाऊ आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे त्याला दिसले.

पतीने दरवाजा वाजवून दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी भावाने तिथून पळ काढला. आपला स्वतःचा भाऊ आणि पत्नीने असा विश्वासघात केल्याने पतीला मोठा मानसिक धक्का बसला.

खरे नाट्य रविवारी रात्री घडले. आरोपी पत्नीने हा वाद मिटवण्यासाठी पती आणि तिच्या प्रियकर भावाला पुन्हा घरी बोलावले. चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी आरोपी भावाने अचानक चाकू काढून पतीच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पतीने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केला असता, चाकूने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापला गेला आणि बोटांना गंभीर दुखापत झाली.

पती जीव वाचवून पळण्याच्या प्रयत्नात असताना, पत्नीनेही क्रूरतेचा कळस गाठला. तिनेही चाकूने पतीच्या डाव्या मांडीवर खोलवर वार केले. कसाबसा जीव वाचवून हा मजूर घराबाहेर पडला. सुरुवातीला स्थानिक दवाखान्यात दाखवल्यानतंर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या दोन्ही आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

The post पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला appeared first on Police Mahanagar.

अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक;९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा
अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक;९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पसार होणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात वाळूज पोलिसांना मोठे यश आले आहे. हा आरोपी खूप चपळ होता. तो सहजासहज पोलिसांच्या हाती यायचा नाही. त्याने एखादा गुन्हा केल्यानंतर तो संबंधित जिल्ह्यातूनच गायब व्हायचा. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहायचं. आरोपीचा थांगपत्ता कसा लावायचा? याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान असायचं. पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारावर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे त्याला पकडल्यानंतर त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईचं सध्या शहरात कौतुक होत आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव राहुल कंत्राज पवार असे आहे. तो डोमेगावचा रहिवासी आहे. त्याच्या अटकेमुळे पाच जिल्ह्यांतील तब्बल ९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राहुल पवार हा अत्यंत सराईत चोरटा आहे. त्याची गुन्हे करण्याची पद्धत पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली होती. तो एका जिल्ह्यात घरफोडी किंवा चोरी केल्यानंतर तात्काळ आपले ठिकाण बदलून दुसऱ्या जिल्ह्यात आश्रय घेत असे. वाळूज पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी मिरजगाव, जामखेड, पुणे यांसारख्या विविध भागांत तपास केला. मात्र तो प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होता.

वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे राहुलचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर २५ मार्चला पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एका परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाळूजसह पुणे, बीड, अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली. आरोपीकडून चांदीचे ब्रेसलेट आणि दागिने, मौल्यवान साड्या, विदेशी दारूच्या बाटल्या, चोरीच्या एकूण ३ मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ७ हजार २८० रुपये इतकी आहे.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

The post अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक;९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा appeared first on Police Mahanagar.

नाशिकमध्ये खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकरण समोर; ८ महिलांचा विनयभंग आणि अत्याचार, तब्बल ९ गुन्हे दाखल
नाशिकमध्ये खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकरण समोर; ८ महिलांचा विनयभंग आणि अत्याचार, तब्बल ९ गुन्हे दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असताना आता नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत ६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिलांचा गेल्या काही २ वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक छळ सुरू होता. अखेर पीडित महिलांनी तक्रार केल्यानंतर या प्रकाराची भीषणता समोर आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना सदर ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन देखील शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. ज्यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक ९९२३३२३३११ वर मेसेज पाठवू शकतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

एकूण ८ पीडित महिला यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. तर एका पुरुषाने देखील दिलेल्या तक्रारीहून १ गुन्हा असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तार असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी यांचे नाव आहेत. आठ दिवसांपूर्वी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनतर आज दुसऱ्या गुन्ह्या संदर्भात ५ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकिलांकडून बुधवारी सुनावणी दरम्यान युक्तीवाद करण्यात आला की, या प्रकरणाचा आणखी तपास करणे बाकी असून, आणखी काही महिलांच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आरोपींच्या वकिलांनी “या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला आहे. महिलांनी इतक्या महिन्यानंतर तक्रार का दाखल केल्या? अधिकची पोलिस कोठडीची गरज नाही”, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणात आता शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली या एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. पुढे तपासात काय-काय बाबी समोर येतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

The post नाशिकमध्ये खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकरण समोर; ८ महिलांचा विनयभंग आणि अत्याचार, तब्बल ९ गुन्हे दाखल appeared first on Police Mahanagar.

परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास ४० हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास ४० हजार घेताना रंगेहात अटक

योगेश पांडे / वार्ताहर

परभणी – राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली असून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना फास आवळला आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यात चक्क शिपायांपासून तहसीलदारपर्यंतच्या अधिकाऱ्यांस बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता सिद्धच झालं आहे. कारण, बुधवारी एकाच दिवशी दोन लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे, जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता तरी सरकारी कार्यालयात पैस दिल्याशिवाय काम होईल की नाही, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

परभणीच्या पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला ५० हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका टीमने अटक केली. मात्र, लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे परभणीच्या पाथरी तालुक्यातील भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिक बिडकर यांनी चुकीची मोजणी करून नकाशा बनवला होता, तीच मोजणी पुन्हा करुन अचूक नकाशा बनवून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार, तक्रारदाराकडून लिपिक बिडकर यांच्याकडून लाचेची रक्कम आठ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. दरम्यान, दोन्ही प्रकरणात तपास केला जात आहे.

The post परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास ४० हजार घेताना रंगेहात अटक appeared first on Police Mahanagar.

विराज स्टील प्रकल्पाच्या जनसुनावणीत समर्थन-विरोधाचा सूर
विराज स्टील प्रकल्पाच्या जनसुनावणीत समर्थन-विरोधाचा सूर

बोईसर / विभूती मेस्त्री

बोईसर : विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी बुधवारी (८ एप्रिल २०२६) संमिश्र वातावरणात पार पडली. सुनावणीदरम्यान विविध मुद्द्यांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली असून ग्रामस्थांनी समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका मांडल्या.

काही ग्रामस्थांनी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा ग्रामसभेत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जनसुनावणीच्या ठिकाणाबाबत पर्यायी व्यवस्था करावी, असे मतही मांडण्यात आले. पर्यावरणीय मुद्द्यांवर भर देताना नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.

दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा सकारात्मक दृष्टिकोनही अनेकांनी व्यक्त केला.

साधारण, मान, वारंगडे, बारीपाडा, सुतारपाडा व गुंडले येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थ सुनावणीस उपस्थित होते. काही आक्षेप नोंदवण्यात आले असले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही सुनावणी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.

शेवटी, उपस्थितांचे आभार मानून अधिकाऱ्यांनी जनसुनावणी संपन्न झाल्याची घोषणा केली.

The post विराज स्टील प्रकल्पाच्या जनसुनावणीत समर्थन-विरोधाचा सूर appeared first on Police Mahanagar.

मानकोली ब्रिजवर स्टंटबाजी; रील बनवणाऱ्या तिघांवर कारवाई
मानकोली ब्रिजवर स्टंटबाजी; रील बनवणाऱ्या तिघांवर कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली: विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानकोली ब्रिज परिसरात धोकादायक स्टंटबाजी करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांनी होंडा अ‍ॅक्टिवा (MH 05 EU 8768) या दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवून त्याची ‘रील’ तयार करून इंस्टाग्रामवर प्रसारित केली होती.

या प्रकरणी गणेश राजू फोंडा रेड्डी (वय २२), कबीर मच्छिंद्र नेतकर (वय २२) आणि यश नितेश मालवणकर (वय २३, तिघेही रा. डोंबिवली पश्चिम) यांचा शोध घेऊन त्यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ (धोकादायक वाहन चालविणे), १२८ (दुचाकीवर प्रवाशांची मर्यादा) व १२९ (हेल्मेट वापरासंबंधी नियम) अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच संबंधित दुचाकी ट्राफिक पोलिसांच्या मदतीने जप्त (इंपाऊंड) करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

The post मानकोली ब्रिजवर स्टंटबाजी; रील बनवणाऱ्या तिघांवर कारवाई appeared first on Police Mahanagar.

मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट, तपास सुरू
मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट, तपास सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. किशोर म्हस्के असे मृत शिपायाचे नाव असून त्यांनी मंगळवारी घाटकोपर येथील राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हस्के हे घाटकोपर परिसरातील सरकारी पोलीस वसाहतीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मंगळवारी त्यांनी घरातच टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून न आल्याने कौटुंबिक वाद, कामाचा ताण किंवा अन्य कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास सुरू आहे.

The post मुंबईत पोलीस शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट, तपास सुरू appeared first on Police Mahanagar.

डोंबिवलीत फेरीवाला कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर धक्काबुक्की; रामनगर पोलिसांत गुन्हा
डोंबिवलीत फेरीवाला कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर धक्काबुक्की; रामनगर पोलिसांत गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : पूर्व रेल्वे स्थानक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला मुक्ती मोहिमेला यश मिळत असतानाच कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर दमदाटी व धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ग व फ प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र केली आहे. नियमबाह्यरीत्या व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याची मोहीम सातत्याने राबवली जात आहे.

दरम्यान, एका कारवाईवेळी फेरीवाल्याचे सामान जप्त करत असताना संबंधिताने संताप व्यक्त करत पालिका कर्मचाऱ्याशी वाद घातला. यावेळी शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली तसेच मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी अतिक्रमण नियंत्रण विभागातील कंत्राटी पर्यवेक्षक धीरज भरत अंकुशे (वय ३१) यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

The post डोंबिवलीत फेरीवाला कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर धक्काबुक्की; रामनगर पोलिसांत गुन्हा appeared first on Police Mahanagar.

“पैशांचा पाऊस” आमिष ठरलं महागात; भोंदूबाबा मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी
“पैशांचा पाऊस” आमिष ठरलं महागात; भोंदूबाबा मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी

पोलीस महानगर नेटवर्क

बारामती : महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बारामती न्यायालयाने भोंदूबाबा मिलिंद जाधव याला दोषी ठरवत चार वर्षांची सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला.

तपासात उघड झाल्यानुसार, आरोपी मिलिंद जाधव महिलांना “पैशांचा पाऊस पाडतो” असे आमिष दाखवत त्यांना अघोरी पूजेत सहभागी करून घेत असे. या पूजेच्या नावाखाली त्यांच्याशी अनुचित वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. याशिवाय, महिलांची आर्थिक फसवणूकही केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयाने जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा प्रकारच्या भोंदूगिरीविरोधात कडक संदेश गेला आहे.

The post “पैशांचा पाऊस” आमिष ठरलं महागात; भोंदूबाबा मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी appeared first on Police Mahanagar.