ठाणे स्थानकात जुन्या पैशांच्या वादातून हल्ला; तरुणाचा मृत्यू

ठाणे स्थानकात जुन्या पैशांच्या वादातून हल्ला; तरुणाचा मृत्यू

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जुन्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल पटेकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पटेकर हा आपल्या मित्रांसह एका मित्राला लोकलमध्ये बसवण्यासाठी ठाणे स्थानकात गेला होता. यावेळी त्याला ओळखीचा एक अल्पवयीन मुलगा भेटला. रेल्वे ट्रॅकजवळ दोघांमध्ये जुन्या पैशांच्या देणंघेणावरून वाद झाला. वाद चिघळल्यानंतर अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला.

दरम्यान, अनमोल या तरुणाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या विशाल पटेकरवरही आरोपीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या विशालला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon