डोंबिवलीच्या ‘शोरमा गर्ल’ची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर भेट; घड्याळ नाकारत मनसेप्रमुखांची खास मागणी

Spread the love

डोंबिवलीच्या ‘शोरमा गर्ल’ची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर भेट; घड्याळ नाकारत मनसेप्रमुखांची खास मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवलेली डोंबिवलीतील ‘शोरमा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी एकता सावंत हिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी तिच्याकडून आणलेली घड्याळाची भेटवस्तू नाकारत मिश्कील शैलीत “मला घड्याळ नको, मस्तपैकी शोरमा घेऊन ये,” अशी खास मागणी केली.

इन्स्टाग्रामवर ‘शोरमा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली एकता सावंत डोंबिवलीत रस्त्यावर शोरमा विक्रीचा व्यवसाय करते. तिच्या स्टॉलवर कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) कडून वारंवार कारवाई होत असल्याची तक्रार तिने सोशल मीडियावर केली होती. या प्रकरणाची दखल घेत अविनाश जाधव यांनी पुढाकार घेत तिला मदत केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर एकताला राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला नवा स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. या घटनेनंतर तिच्या लोकप्रियतेतही मोठी वाढ झाली.

मनसेकडून मिळालेल्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी एकता सावंत ‘शिवतीर्थ’ येथे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेली होती. तिने त्यांना फुलांचा गुच्छ देत आशीर्वाद घेतले. यावेळी तिने भेट म्हणून घड्याळ आणले होते. मात्र, घड्याळ असल्याचे समजताच राज ठाकरेंनी ते नाकारत “मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये,” असे म्हणत ते परत दिले. या प्रसंगी एकताने शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली.

एकता सावंत ही मूळची डोंबिवलीतील असून ती रस्त्यावर शोरमाचा स्टॉल लावून व्यवसाय करते. काही पालिका अधिकारी जाणीवपूर्वक केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई करतात, तर इतर फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिले जाते, असा आरोप तिने केला होता. या संदर्भातील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत जाऊन तिची भेट घेतली होती आणि तिला मदतीचा हात दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon