पोयनाडमध्ये घरफोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त

पोयनाडमध्ये घरफोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

रायगड : पोयनाड येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी जलद आणि परिणामकारक तपास करत आरोपीला अटक केली आहे. CR क्रमांक 47/2026 अंतर्गत दि. १९ एप्रिल २०२६ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात अनिल राठोड याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. यात अंदाजे ६५ हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल फोन तसेच ३ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोयनाड पोलीस करत असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon