पुण्यातील तरुणींनी प्रेमसंबंधांना नकार देताच त्यांची बदनामी करणाऱ्या विकृत तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Spread the love

पुण्यातील तरुणींनी प्रेमसंबंधांना नकार देताच त्यांची बदनामी करणाऱ्या विकृत तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – सोशल मीडियावरून मुलींशी मैत्री करायचा, ओळख वाढली की प्रपोज करायचा आणि समोरच्या मुलीने प्रतिसाद दिला नाही की त्या मुलीच्या नावाचे फेक अकाउंट काढून तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करायचा. अशाच पद्धतीने १० ते १५ मुलींना फसवणाऱ्या नराधमाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश सुरेश म्हात्रे (४०) असं आरोपीचं नाव असून तो मूळ ठाण्याचा रहिवासी आहे. सध्या वसई-विरार परिसरात तो वास्तव्यास असून आरोपी मुलींचा नकार मिळाल्यावर सूड उगवण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्या कॉलगर्ल असल्याचा आभास निर्माण करायचा. त्यामुळे संबंधित तरुणींना अश्लील फोन आणि मेसेज येऊ लागायचे.

उगवण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्या कॉलगर्ल असल्याचा आभास निर्माण करायचा. त्यामुळे संबंधित तरुणींना अश्लील फोन आणि मेसेज येऊ लागायचे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या वाहिनीसोबतही असाच प्रकार केल्यामुळे भावाने घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर बाहेर वेटर, सेक्युरिटी गार्ड असे मिळेल ते काम तो करत असे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे फोटो सापडले असून घराच्या झडतीत आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशा प्रकारांना बळी पडलेल्या इतर तरुणींनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon