भिगवण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; तरुणीने कोर्टात जबाब बदलत सांगितले मला आईकडे जायचंय

Spread the love

भिगवण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; तरुणीने कोर्टात जबाब बदलत सांगितले मला आईकडे जायचंय

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या भिगवण प्रकरणातील मुलीनं तिचा जबाब बदलला आहे. बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं आता तिचा जबाब बदलला आहे. भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लीम समाजातील तरुणासोबत १७ फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला २० फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती.

पुण्याच्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. २० फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा बुधवारी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भिगवण प्रकरणातील तरुणीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टात मुलीला व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे हजर केलं असता मुलीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भिगवण प्रकरणातील मुलीने बुधवारी कोर्टात जबाब बदलला आहे. संबंधित मुलगी या अगोदर तरुणासोबत राहण्यावर ठाम होती. मात्र, बारामती पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तिनं तरुणासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर संबंधित तरुणीला सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भिगवण प्रकरणातील तरुणीनं बुधवारी कोर्टात आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी बारामती कोर्टात हजर केल्यानंतर मुलीला पाच दिवस पुनर्वसन केंद्रात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी कोर्टात हजर केला असता तिनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon