भररस्त्यावर चारचाकीत अल्पवयीन मुलीला भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून बेशुद्ध करत सामूहिक अत्याचार; बुधवारी दोन्ही आरोपींना अटक

Spread the love

भररस्त्यावर चारचाकीत अल्पवयीन मुलीला भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून बेशुद्ध करत सामूहिक अत्याचार; बुधवारी दोन्ही आरोपींना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा-भाईंदर – रात्रीच्या अंधारात, भर रस्त्यावर चारचाकी वाहनात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार मिरा-भाईंदर शहरात उघडकीस आला आहे. भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून मुलीला बेशुद्ध करत, नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. यापूर्वी पालिका मुख्यालयात अल्पवयीन कर्मचाऱ्यावर अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता भररस्त्यावरील या घटनेमुळे संपूर्ण शहर सुन्न झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी ही अल्पवयीन मुलगी ५ जानेवारीच्या रात्री तिच्यामित्राच्या विश्वासाला बळी पडली. २१ वर्षीय सलमान खान याने तिला चारचाकी वाहनात बसवून बळजबरीने एल.आर. तिवारी कॉलेज रोड या कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले. त्याच्यासोबत त्याचा २४ वर्षीय मित्र सरदारजी देखील उपस्थित होता. त्यानंतर वाहनातच अमानुष अत्याचार सुरू झाला. प्रथम पीडित तरुणीला जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या सलमान व त्याच्या मित्राकडून खायला घालण्यात आल्या. मात्र, तरीही ती शुद्धीत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तिला मद्य पाजून पूर्णपणे बेशुद्ध केले. शुद्ध हरपल्यानंतर, दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर चारचाकीतच अत्याचार केला.

या अमानवी कृत्यानंतर धैर्य एकवटत पीडितेने घडलेला सारा प्रकार आपल्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून मिरा रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत बाललैंगिक अत्याचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदववला होता. त्यानंतर त्यांनी शोध घेत, बुधवारी दुपारी दोन्ही आरोपींना अटक केली.

दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता भर रस्त्यावर घडलेला हा प्रकार शहरातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसंच खरंच महिला आणि मुली शहरात सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon