खारघरच्या सेक्टर २० मध्ये मिळाल्या पैशांनी भरलेल्या बॅगा
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका निवडणूक शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय रोमहर्षक होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक प्रचार अधिकृतरित्या बंद झालेला असला तरी मतदारांची भेट घेऊन त्यांना प्रलोभने देणे सुरूच असल्याचे दिसून येते. नवी मुंबईत खारघर सेक्टर २० मध्ये पैशांनी भरलेल्या बॅगा आढळून आल्या. निवडणूक आयोगाने बुधवारी रात्री कारवाई केली.
खारघर सेक्टर २० मध्ये बॅगेत जवळपास २० लाख आढळून आले. खारघर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप माहिती समोर न आल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या कॅश बरोबर कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक नव्हते. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्यासाठी बॅग आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी ९ पर्यंत निवडणूक आयोगाची कारवाई सुरू होती.