महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते; रश्मी शुक्ला कार्यमुक्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे (भा.पो.से.) वरिष्ठ अधिकारी श्री. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.
प्रशासनिक अनुभव, कर्तव्यनिष्ठा आणि कठोर निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे श्री. सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा अनुभव मोलाचा ठरणार असल्याचे मत पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.