नौपाडा पोलिसांची प्रभावी कामगिरी; हरवलेला मोबाईल शोधून मूळ मालकास सुरक्षित सुपूर्द
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथील पोलिसांनी तात्काळ तपास व प्रभावी कार्यवाही करत हरवलेला मोबाईल फोन शोधून काढला असून तो मूळ मालकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केला आहे.
हरविलेल्या मोबाईलबाबत संबंधित नागरिकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरित तांत्रिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक साधनांच्या सहाय्याने मोबाईलचा शोध घेण्यात आला.
पोलीसांच्या तत्परतेमुळे व काटेकोर तपासामुळे अल्पावधीतच मोबाईल सापडला. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकाने नौपाडा पोलिसांचे आभार मानले आहेत.
नौपाडा पोलीस स्टेशनच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.