मुंबईकरांसाठी मोठी बातमी; शहरात उभारले जाणार आणखी ४ पोलीस स्टेशन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई: मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये आता ४ नवीन पोलीस स्टेशन्स उभारले जाणार आहे. चारही पोलीस स्टेशनला मंजुरीही देण्यात आली आहे. महाराष्ट्र नगर, गोळीबार पोलीस ठाणे,मढ मार्वे आणि असल्फा इथं हे चार पोलीस स्टेशन उभारले जाणार आहे.
अशी एकूण ०४ नवीन पोलीस ठाणे असणार आहेत. सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत १३ परिमंडळ आहेत. याची पुनर्रचनाकरुन ०२ नवीन परिमंडळ कार्यरत करणार आहेत. त्याचसोबत ०३ नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण होणार आहेत. त्यामुळे या चारही भागात पोलीस स्टेशनमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता या चारही नव्या पोलीस स्टेशनमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल.