पुण्यात महसूल विभागची मोठी कार्यवाई; अवैध उत्खनन प्रकरणी ३ तहसीलदारांसह ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठी निलंबीत
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – महसूल विभागाने खळबळजनक कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरुळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. याप्रकरणी ३ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ९० हजार ब्रास अवैध उत्खनन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगरुळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने ३ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे.