बुलढाण्यात नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोघेजण ताब्यात; गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती

Spread the love

बुलढाण्यात नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोघेजण ताब्यात; गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती

योगेश पांडे / वार्ताहर

बुलढाणा – राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून मतदारांचा कौल मंगळवारी मतपेटीत कैद झाले आहे. निवडणुकांच्या निकालाअंती मतदारराजानं कुणाला साथ दिली आहे, हे कळू शकणार आहे. असे असताना राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहे. तर मतदार याद्यांमधील घोळ इत्यादी कारण मतदारांचा मनस्ताप वाढवणारा ठरतो आहे. अशातच बुलढाण्यात २ बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्रात वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोप करते उमेदवारांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon