दादाभाई नौरोजी नगर पोलीसांची कारवाई; घरफोडी प्रकरणातील आरोपीला दोन वर्षांची शिक्षा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : दादाभाई नौरोजी नगर पोलिसांनी दाखल केलेल्या घरफोडी आणि चोरीच्या गंभीर प्रकरणात आरोपीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
फिर्यादी सदफ बाबुलाल इनमदार यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक १२४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये नोंदविण्यात आला होता.
✔ घटनाक्रम
दिनांक २०/११/२०२४ रोजी रात्री २०:०० वाजेच्या सुमारास ते २१/११/२०२४ रोजी सकाळी ०८:३० दरम्यान अनोळखी व्यक्तीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीस नेले.
तपासादरम्यान दिनांक २२/११/२०२४ रोजी संध्याकाळी १८:२० वाजता पवई परिसरातून आरोपी
फरदीन उर्फ अमिन फिरदोस खान (वय २४), रा. करीमुल्ला चाळ, पठाणवाडी, पवई
याला अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
✔ न्यायालयाचा निकाल
सदर प्रकरणात मा. श्रीमती एस. जी. अगरवाल, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, १० वे न्यायालय, अंधेरी यांनी आरोपीला दोन वर्षे कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या कारवाईत तपास अधिकारी सुनित घाडगे, सहा. पोलीस निरीक्षक, दा. नौ. नगर पोलीस ठाणे तर सरकारी अभियोक्ता म्हणून मा. श्री फिराजे शेख, १० वे न्यायालय, अंधेरी पूर्व तसेच कोर्ट कामकाज हे सहा. पो. उपनिरीक्षक मधुकर आव्हाड व पो. शि. नागेश पंडित
यांचे विशेष योगदान राहिले.
संपूर्ण तपास आणि कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मचिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.