नवी मुंबईतील स्पा सेंटरवर पोलीसांची धाड; महिला मॅनेजरला अटक तर ६ महिलांची सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईच्या जुहूगावमध्ये एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची खबर मिळताच नवी मुंबई पोलिसांनी (गुन्हे शाखा) मसाज सेंटरवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ६ महिलांची सुटका केली. जुहूगावमध्ये आरपणाच सलून आणि स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी महिला मॅनेजरला अटक केली आहे. अशिमा रॉबिन घोष (३४) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. ती मूळची कोलाकाताची असून वाशी येथे राहायची. आरोपीचा महिलेचा पार्टनर मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. नूर आलम शेख असं या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे. वाशीतील सेक्टर ११ मध्य जुहू गावात हा धक्कादायक प्रकार सुरु होता. जुहूगाव येथे “आरपणाच सलून आणि स्पा” या ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक धंद्याबाबत पोलिसांनी खबर मिळाली होती. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या स्पा सेंटरवर कारवाईचा बडगा उगारला.
पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये धाड टाकताच तिथे सहा महिला काम करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी कसून तपास करून पोलिसांनी स्पा सेंटरची मॅनेजर अशिमा रॉबिन घोषला बेड्या ठोकल्या. तिचा पर्टनर नूर शेख जो मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. या दोघांनी मिळून स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले, अशी माहिती समोर आलीय.