रविवारी सुट्टीच्या दिवशी पुण्यात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांचे रिसॅार्ट जमीनदोस्त, ३०० बांधकामे पाडणार

Spread the love

रविवारी सुट्टीच्या दिवशी पुण्यात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांचे रिसॅार्ट जमीनदोस्त, ३०० बांधकामे पाडणार

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहराजवळच खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि पवना धरण पाणलोट क्षेत्रात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे रिसॉर्ट,फार्महाऊस आणि अन्य अनधिकृत बांधकामे सुरु होती. प्रशासन आणि जलसंपदा विभागाने मोठ्या मोहिमेंतर्गत काल शनिवारी २२ नोव्हेंबरपासून थेट कारवाईला सुरुवात केलीय.

प्रशासनाने प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांनी उभारलेल्या रिसॉर्टवर थेट कारवाई करत ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त केले आहेत. या रिसॉर्टच्या मालकाकडे फक्त १२ गुंठे जमीन असतानाही त्याने ३२ गुंठ्यांवर बांधकाम केले होते. त्यामुळे २० गुंठे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३०० बांधकाम तोडण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई फक्त एका ठिकाणीच नव्हे तर खडकवासला परिसरात जवळपास १००,पानशेतमध्ये ३०,पवना १२ आणि वरसगाव ५ अशा एकूण ३०० अतिक्रमणांवर करण्यात आली आहे.या प्रक्रियेमुळे अनेक जुने फार्महाऊस,रिसॉर्ट आणि दारू भट्ट्याही हटवण्यात आल्या. कारवाईची प्रकिया सध्या सुरु असून पुढील काही दिवस ती सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon