कल्याण पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : आर्थिक फसवणुकीतील ₹११ लाख तक्रारदारास परत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – जनतेचा विश्वास – ठाणे पोलिसांचा संकल्प! पोलिस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक जानुसिंग पवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे आर्थिक फसवणुकीतील तब्बल ₹११ लाखांची रक्कम तक्रारदार सौ. सुचिता सावंत यांना यशस्वीपणे परत मिळाली.
या संपूर्ण कार्यवाहीबद्दल तक्रारदार सौ. सुचिता सावंत तसेच डॉ. निखिल जाधव यांनी ठाणे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेली वेगवान आणि प्रभावी कामगिरी नागरिकांच्या सुरक्षेसाठीची त्यांची बांधिलकी अधोरेखित करते.
ठाणे पोलिसांच्या या तातडीच्या आणि पारदर्शक कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वासाची भावना अधिक दृढ होत आहे.