वर्तकनगर पोलिसांची तत्पर कारवाई! हरवलेला ₹९० हजारांचा मोबाईल अल्पावधीत शोधून तक्रारदारास परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – वर्तकनगर पोलिसांनी आपली तत्परता व कार्यकुशलता दाखवत हरवलेला तब्बल ₹९०,००० किंमतीचा मोबाईल फोन अल्पावधीत शोधून तक्रारदारास परत दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा मोबाईल काही दिवसांपूर्वी हरवला होता. याबाबत त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून मोबाईलचा लोकेशन ट्रेस केला आणि शिताफीने तो हस्तगत केला.
तक्रारदारास मोबाईल परत देताना त्याने ठाणे पोलिसांचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांच्या या तत्पर आणि जनहितकारी कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
“हरवलेले मालमत्ता शोधून देण्यात ठाणे पोलिसांचा विश्वास आणि कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे,” असे नागरिकांनी सांगितले.