अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई; सराईत ड्रग्ज तस्कर ‘रोमा उर्फ पगली’ला PIT-NDPS अंतर्गत एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

Spread the love

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई; सराईत ड्रग्ज तस्कर ‘रोमा उर्फ पगली’ला PIT-NDPS अंतर्गत एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने ड्रग्ज तस्करीत सक्रिय असलेल्या सराईत महिला गुन्हेगार रोमा आरिफ शेख उर्फ ‘पगली’ (वय ३७, रा. माझगाव, मुंबई) हिला PIT-NDPS अधिनियम १९८८ अंतर्गत एक वर्षासाठी कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

रोमा शेख हिच्यावर मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाच्या विक्रीसंबंधी एकूण आठ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असून सर्व प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पूर्वी भायखळा पोलिस ठाण्याने तिच्यावर कलम ११० फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतरही ती पुन्हा ड्रग्ज विक्रीच्या अवैध धंद्यात सक्रिय झाल्याचे तपासात उघड झाले.

या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिटने राज्य शासनाकडे PIT-NDPS अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. गृह विभाग, महाराष्ट्र शासनाने प्रस्तावाला मान्यता देत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रोमा शेखला कोल्हापूर कारागृहात दाखल केले.

रोमा आरिफ शेख उर्फ ‘पगली’ विरुद्ध दाखल प्रमुख गुन्हे :

१. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिट – गु.र.क्र. २८/२०२५ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(ब))
२. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिट – गु.र.क्र. ३१/२०२३ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(क), २९)
३. भायखळा पोलीस ठाणे – गु.र.क्र. १२९/२०१६ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(क))
४. भायखळा पोलीस ठाणे – गु.र.क्र. १४०/२०१७ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(ब), २९)
५. भायखळा पोलीस ठाणे – गु.र.क्र. १२६/२०१८ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(ब), २९)
६. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई – गु.र.क्र. ४०/२०२१ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(क), २७(अ), २८, २९)
७. गुन्हे प्रकटीकरण शाखा-३, मुंबई – गु.र.क्र. २३/२०२३ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २१(ब), २९)
८. डोंगरी पोलीस ठाणे – गु.र.क्र. ४१८/२०२४ (एन.डी.पी.एस. कलम ८(क), २१(ब), २९)

या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले असून, तिच्या संपर्कात असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कारवाई श्री. देवेन भारती (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), श्री. लखमी गौतम (सह पोलीस आयुक्त – गुन्हे), श्री. शैलेश बलकवडे (अपर पोलीस आयुक्त – गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नवनाथ ढवळे (उप पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर, पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे (प्रभारी, बांद्रा युनिट), स.पो.नि. कारकर, पो.शि. विक्रम काळे, तसेच गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या व.पो.नि. सुवर्णा अडसुळे, पो.नि. सरीता गावडे, आणि पो.उ.नि. सतिष निंबाळकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या या ठोस कारवाईमुळे महानगरातील अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon