रिक्षात विसरलेली ₹६४,९०० रोख रक्कम व महागडा मोबाईल अवघ्या ३ तासांत परत; मानपाडा पोलिसांची तत्पर कामगिरी

Spread the love

रिक्षात विसरलेली ₹६४,९०० रोख रक्कम व महागडा मोबाईल अवघ्या ३ तासांत परत; मानपाडा पोलिसांची तत्पर कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : रिक्षा प्रवासादरम्यान चुकून रिक्षामध्येच राहिलेल्या बॅगेतील ₹६४,९००/- रोख रक्कम, सुमारे ₹३०,०००/- किमतीचा मोबाईल फोन व इतर महत्त्वाची कागदपत्रे अवघ्या तीन तासांत शोधून तक्रारदारास सुपूर्द करण्यात मानपाडा पोलीस यांना यश आले आहे.

तक्रारदाराने रिक्षातून उतरल्यानंतर बॅग विसरल्याचे लक्षात येताच तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवताच तत्काळ कारवाई सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संबंधित रिक्षाचा मार्ग शोधणे तसेच रिक्षाचालकाशी संपर्क साधणे अशी समन्वयित कार्यवाही राबविण्यात आली.

अवघ्या तीन तासांच्या आत संबंधित रिक्षा व चालकाचा शोध घेण्यात आला. रिक्षात राहिलेली बॅग सुरक्षित अवस्थेत सापडली. बॅगेतील रोख रक्कम, मोबाईल फोन व कागदपत्रांची पडताळणी करून ती तक्रारदारास सुपूर्द करण्यात आली.

मानपाडा पोलिसांच्या या तत्पर, पारदर्शक व संवेदनशील कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon