ट्रक आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात;;बाप अन् लेकाचा जागीच करुण अंत

Spread the love

ट्रक आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात;;बाप अन् लेकाचा जागीच करुण अंत

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – ट्रक आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तेल्हारा परिसरात घडला आहे. या अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेल्या पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. शहजाद गुलाम उस्मानी (५२) आणि आतिफ शेहजाद उस्मानी (२२) अशी मृत पिता पुत्राची नावं आहेत.

पेल्हार येथील रहिवासी असलेले शहजाद गुलाम उस्मानी व त्यांचा मुलगा आतिफ शहजाद उस्मानी हे दोघेजण कामानिमित्त स्वतःचीच रिक्षा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार परिसरातील पेट्रोल पंपनजीक एक भरधाव वेगातील ट्रक आणि दोघे पितापुत्र प्रवास करत असलेल्या रिक्षाचा भीषण असा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पूर्णतः दबली गेली. अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेले दोघे पिता पुत्र शहजाद गुलाम उस्मानी व आतिफ शेहजाद उस्मानी हे गंभीररित्या जखमी झाले.

दोघांना उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेल्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon