सायबर जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर : सायबर जनजागृती महाअंतर्गत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने बदलापूर हायस्कूल व ज्ञानमुद्रा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे प्रतिबंध विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोउपनिरीक्षक अनिल जाधव, पोहवा बनकर, पोहवा पाटील तसेच सायबर एक्सपर्ट श्री. गौरव जगताप यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती देत जागरूकता निर्माण केली.
विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सायबर फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय जाणून घेतले.