सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृती मोहीम; ओझोन व्हॅली सोसायटीत कळवा पोलीस स्टेशनचा उपक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कळवा पोलीस स्टेशनतर्फे ओझोन व्हॅली सोसायटी येथे सायबर क्राईम जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली.
या मोहिमेत नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी व वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे महत्त्व, संशयास्पद लिंक व कॉल्सपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कळवा पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रसंगी सांगितले की, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता हाच गुन्हे टाळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. नागरिकांनी कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला ओझोन व्हॅली सोसायटीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.