डोंबिवलीत पोलीसांचा रूट मार्च; नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चदरम्यान परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन करत पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले.
यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, शांतता व सौहार्द राखण्याचे तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नवरात्र उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला.