लोको पायलटच्या कॅबिनमध्ये घुसून एक मराठा लाख मराठा पोस्टर लावलं
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी मराठा आंदोलक दिसून येत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मराठा आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून आहेत.सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक हलगीवर ठेकाही धरताना दिसले. मात्र आज मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर उभ्या असणाऱ्या लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावलं.
लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्ये मराठा आंदोलक घुसले होते.लोको पायलटच्या कॅबिनमध्ये एक मराठा लाख मराठाचे पोस्टर लावण्यात आले.मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सोडण्यात आली.