छत्रपती संभाजीनगरात अवैध धंद्याचा पर्दाफाश; १५ लाख रुपयांचा दीड किलो चरस जप्त करत ५ आरोपींना बेड्या

Spread the love

छत्रपती संभाजीनगरात अवैध धंद्याचा पर्दाफाश; १५ लाख रुपयांचा दीड किलो चरस जप्त करत ५ आरोपींना बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी अवैध धंद्याचा पर्दाफाश करत. त्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुकुंदवाडी पोलिसांची गस्त सुरू असताना चरस विक्री होत असल्याची टीप मिळाली. विशेष पथकासह मुकुंदवाडी च्या पथकाने अंबिका नगर येथील एका इमारती छापा टाकला. तर तेथे तब्बल १५ लाख रुपयांचा दीड किलो चरस आढळला. पोलिसांकडून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सव तसेच सण उत्सवाच्या काळामध्ये मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घोरपडे हे गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदारा तर्फे माहिती मिळाली. अंबिका नगर येथील एका इमारतीमध्ये गांजा चरस विक्री होत आहे.

यावरून विशेष पथकाचे सहपोलीस निरीक्षक संजय बहुरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे,पो.ह.नरसिंह पवार, पो.ह.बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांचा पथक तयार करण्यात आलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबिका नगर येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पथकाने छापा टाकला. त्यांच्याकडे १५ लाख रुपये किमतीचा तब्बल दीड किलो चरस आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक संजय बहुरे करीत आहेत. मोहम्मद मुजममील मोहम्मद नजीर – २४,नोमान खान इरफान खान – २१, मोहम्मद लइकुद्दीन मोहम्मद मिराजजोद्दीन – २५,शेख रेहान शेख अशफाक – १९ आणि शेख सुलताना शेख मैंनोउद्दीन – ४५ अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon