रायगड जिल्ह्यात रिक्षाचा भीषण अपघात, शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तीन जणांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. म्हसळा तालुक्यातील खामगाव नजीक पॅजिओ रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणघर शाखा प्रमुख संतोष सावंत हे आपल्या ताब्यातील पियाजियो रिक्षा घेऊन गोरेगाव दिशेकडे जात असताना हा अपघात झाला. यामध्ये संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
संतोष सावंत हे गोरेगाव दिशेकडे जात होते. यावेली म्हसळा गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांच्या वाहनाचा ब्रेक फेल झाला यानंतर वेगात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला आदळले. या अपघातामध्ये संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील प्रवासी शांताराम काळीदास धोकटे व शर्मिलाबाई तुकाराम धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.