आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, संजय गायकवाड यांना पहिला मोठा दणका

Spread the love

आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, संजय गायकवाड यांना पहिला मोठा दणका

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. खराब जेवण दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. समाजमाध्यमातील व्हिडिओ आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारावर अदलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान आता या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे. सेक्शन ३५२, ११५ (२) अंतर्गत एनसी दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. कुणी सभागृहात मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या नियमाप्रमाणे बोलावं लागतं . त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आम्ही काय फार मोठे काम केले नाही, की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. अशा अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना फिर्यादी होता येत नाही. विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी ते करायला सांगितलं असेल. मला पश्चाताप नाही . शिंदे साहेब मला फोनवर बोलले, राग कट्रोल करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला असं यावेळी गायकवाड यांनी म्हटलं आहे. मंगळवारी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला होता, संजय गायकवाड यांनी जेवनाची ऑर्डर दिली होती, मात्र त्यातील दाळीला वास येत होता, भात शिळा होता असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon