नवविवाहितेचं कृत्याने सांगली हादरली ! १५ दिवसा पूर्वीच लग्न झालेल्या बायकोने वटपौर्णिमेच्या दिवशीच झोपलेल्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं

नवविवाहितेचं कृत्याने सांगली हादरली ! १५ दिवसा पूर्वीच लग्न झालेल्या बायकोने वटपौर्णिमेच्या दिवशीच झोपलेल्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं

योगेश पांडे / वार्ताहर 

सांगली – इंदौरच्या राजा रघुवंशीच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रियकराच्या मदतीने पत्नी सोनम रघुवंशीने राजाला संपवलं. ही घटना ताजी असतानाचा सांगलीच्या कुपवाड येथेही अशीच एक घटना घडली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिल तानाजी लोखंडे (५०) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता. यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्याने १७ मे रोजी अनिल लोखंडे यांचे राधिकाशी लग्न झालं होतं. पतीच्या हत्ये प्रकरणी राधिका इंगळे हिला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon