शिर्डी पुन्हा हादरली ! घरगुती वादातून पोटच्या पोरानेच बापाला संपवले; आरोपी मुलगा पोलीसांच्या ताब्यात

Spread the love

शिर्डी पुन्हा हादरली ! घरगुती वादातून पोटच्या पोरानेच बापाला संपवले; आरोपी मुलगा पोलीसांच्या ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर

शिर्डी – महिनाभरापूर्वी तासाभऱ्याच्या अंतराने साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकत संपवल्यानंतर दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची पाईपने जबर मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडे पडले आहे .आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ६ मार्चला घडलेल्या या घटनेचा पाच दिवसानंतर उलगडा झाला असून अकस्मात मृत्यू दाखवत हत्या लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे आता उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय शंकर गोंदकर असे मारहाणीतून हत्या झालेल्या ५४ वर्षीय वडिलांचे नाव आहे. आरोपी मुलगा शुभम गोंदकर याने घरगुती वादातून वडिलांना पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना लपवण्यासाठी अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगत घटना दडवण्याचा त्याने प्रयत्न केला. घटनेच्या शवविच्छेदन अहवालातून जबर मारहाणीतून त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ६ मार्चला घडलेल्या घटनेनंतर पाच दिवसांनी हा खुलासा झालाय. शवविच्छेदन अहवाल समोर येताच शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत हत्येचा गुन्हा दाखल केलाय.

प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मध्ये ६ मार्च २०२५ रोजी रात्री आठ वाजता ही घटना झाल्याचं कळतंय. शिर्डीचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय शंकर गोंदकर यांना घरगुती वादातून शुभम गोंदकर या त्यांच्या मुलाने पाईप ने मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की या मारहाणीतच दत्तात्रेय गोंदकर यांचा मृत्यू झाला. मारहाणीत मृत्यू झाल्याचे कोणाला कळू नये म्हणून शुभम गोंकरने वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. मारहाणीतच दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत पाच दिवसांनी म्हणजेच दहा मार्च २०२५ रोजी शुभम गोंदकर वर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. शिर्डीत महिनाभराच्या अंतराने दुसरे हत्याकांड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ३ फेब्रुवारी २०२५ ला पहाटे ड्युटीला जाणाऱ्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकत संपवण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण होते. आता महिन्याभराच्या अंतराने शिर्डी पुन्हा हादरली आहे. घरगुती वादातून पोटच्या मुलाने पाईपने वडिलांना बेदम मारहाण करत संपवल्याची घटना घडली आहे. आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडे पडले आहे .आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून पासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon