पंतनगर पोलिसांकडून विधिज्ञमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन
रवि निषाद/मुंबई
मुंबई – घाटकोपर पंतनगर पोलिसांनी सोमवार २७ जानेवारी रोजी आईपीसी, सीआरपीसी आणि आता नवीन लागू झालेला बीएनएस कायदा संदर्भात प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नामवंत विधिज्ञ मार्फत कायद्यासंदर्भात काय होऊ शकतं हे सांगण्यात आले.
पंतनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांचा निर्देशानुसार येथील टेक्निकल हायस्कुल कॉलेज आणि कनिष्ठ महा विद्यालय मध्ये आयोजित या कार्यक्रमात विक्रोळी कोर्ट बार एशोसीयसनचे अध्यक्ष ऍड. समाधान सुलानी, ऍड. सुनील शेट्टी आणि ऍड.योगिता सुनील गाडे यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. शेट्टी यांनी सांगितले की, आता सर्व काही डिजिटल झालं आहे म्हणून कायद्याचे अपडेट आवश्यक होते. आता सर्वात जास्त साइबर क्राइम होत आहेत.अगोदर ५ प्रकारची सजा होती, मात्र आता त्यात अजुन एका प्रकाराच्या सजेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर फाशी, आजीवन, तीन, पाच आणि सात वर्ष, मालमत्ता जप्ती व दंड असा होत होता. आता यात एक अजुन समावेश करण्यात आले आहे. कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे न्यायालयात जे काम जज सांगतील ते बिना वेतन करायचे. ऍड.योगिता सुनील गाडे यांनी बालगुन्हेगार व बालकांवर होणाऱ्या अत्यचारासंदर्भात काय काय होऊ सकते ते सांगितले. पोक्सोमध्ये काय होऊ शकतं आणि महिलांसंदर्भात काय काय गुन्हे होत आहेत त्यात किती सजा किवा काय काय होऊ सकते या संदर्भात सांगितले तसेच जेष्ठ अधिवक्ता आणि विक्रोळी बार एशोसीयसनचे अध्यक्ष ऍड. समाधान सुलानी यांनी अनेक कायद्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले. त्यानी सांगितले की, आता सर्वात जास्त क्राइम मोबाइल द्वारे होत आहेत.यात काय काय होऊ शकते आणि त्यात काय काय खबरदारी घेन्याची गरज आहे. या सर्व विषया संदर्भात त्यानी आपले विचार मांडले तसेच शिवाजी टेक्निकल स्कूलचे प्राध्यापक यानी ही आपले मत मांडले. यावेळी उमेश अहवाड आणि रवि अहवाड सह इतर पोलिस अधिकारी कर्मचारी महिला पोलिस कर्मचारी सह मुहल्ला एकता कमेटीचे पधाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतनगर पोलिसांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले.